‘ मुलींच्या जन्मांचे ‘ खैरेवाडीत स्वागत.


बालसंस्कार आणि कला आविष्कार शिबीर


मोफत सर्व आरोग्य तपासणी शिबीर – निरामय आधारघर ‘ खैरेवाडी
प्रेरणा
राजीव-रजन लाड ट्रस्ट , खैरेवाडी , शिक्रापूर जवळ , तालुका शिरूर , जिल्हा पुणे , यांच्यावतीने प्रेरणा ( Motivation ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम न्यू इग्लिंश स्कूल , धामारी गाव आणि विद्याधाम हायस्कूल , कान्हूर मेसाई गाव या दोन शांळामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात आला. मुंबई येथे शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग घेणाऱ्या सौ.शरयू धाडी यांनी हा कार्यक्रम घेतला. त्यावेळी इयत्ता ६ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यानी भाग घेतला. सदर कार्यक्रमामधून ‘आपण किती आयुष्य जगलो यापेक्षा ते आयुष्य कसे जगलो आणि कशाप्रकारे जगावे याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यासाठी शरयूताईंनी स्वतःच्या विकलांग मुलाबद्दलची सर्व माहिती एका सी.डी. द्वारे सांगितली . स्वतःच्या आयुष्याबद्दल सतत सकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये बाळगून आणि परमेश्वराबद्दल दृढ श्रध्दा ठेवून एक आदर्श जीवन कसे उभे करता येऊ शकते ह्याचे वर्णन त्यांनी केले. या कार्यक्रमातून जीवनाबद्दल एक नविन दृष्टिकोन बाळगून सकारात्मक बदल होऊ शकतो असा अनुभव आहे असे प्रतिपादन शरयूताईंनी केले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर नियतीला न भिता तिच्याशी मैत्री करता येते असा संदेश त्यांनी दिला. या कार्यक्रमाला २५० ते ३०० विद्दार्थी आणि शिक्षक वर्ग यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच भविष्यात अशाप्रकारचे कार्यक्रम व्हायला हवेत अशी इच्छा ही सर्वांनी व्यक्त केली.